ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
नौदलाने नौदलतळ, नौदल युनिट आणि नौदलाच्या मालमत्तांच्या तीन किलोमीटरच्या परिघात ड्रोनसारख्या हवाई वस्तूंच्या उड्डाणावर बंदी घातली आहे. संरक्षण प्रवक्त्याने यासंदर्भात माहिती दिली.
जम्मू-काश्मीरमधील हवाई दलाच्या तळावर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून नौदलाने हा निर्णय घेतला आहे.