ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतीय नौदलाला आज 90 % स्वदेशी उपकरणे लावलेली ‘कवरत्ती’ युद्धनौका मिळाली आहे. प्रोजेक्ट 28 अंतर्गत ही युद्धनौका बनवण्यात आली असून लष्कर प्रमुख जनरल एम एम नरवणे आज विशाखापट्टनममध्ये ही युद्धनौका नौदलाकडे सोपिवली आहे.
एक मजबूत एएसडब्ल्यू कॉर्वेट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, कवरत्तीची रचना भारतीय नौदलाच्या नेव्हल डिझाईन संचालनालयाने (डीएनडी) केली आहे, आणि कोलकाताच्या गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स (जीआरएसई) यांनी त्याची बांधणी केली आहे. स्वदेशीकरणाच्या माध्यमातून स्वयंपूर्ण होण्याची भारतीय नौदल, जीआरएसई आणि देशाची वाढती क्षमता यातून दिसून येते . या जहाजासाठी 90% देशी सामग्री वापरली असून सुपरस्ट्रक्चरसाठी कार्बन कंपोझिटचा वापर करून भारतीय जहाज बांधणीत कौतुकास्पद यश मिळवले आहे. जहाजाचा शस्त्रे आणि सेन्सर विभाग पूर्णपणे स्वदेशी आहे आणि ते या क्षेत्रात देशाची वाढती क्षमता दाखवते.
कवरत्तीकडे अत्याधुनिक शस्त्रे आणि सेन्सॉर विभाग असून पाणबुडी शोधून त्यावर कारवाई करण्यास सक्षम आहे. पाणबुडीविरोधी युद्धनौकेच्या क्षमतेव्यतिरिक्त, जहाजात एक विश्वासार्ह स्वसंरक्षण क्षमता आणि लांब पल्ल्याच्या तैनातीसाठी चांगली चिकाटी देखील आहे.
दरम्यान, या प्रकल्पाची सुरुवात 2003 मध्ये करण्यात आली होती. आयएनएस कमार्टा (2014), आयएनएस कदमत (2016), आयएनएस किल्टन (2017) या तीन युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात आहेत.