नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाकडून (कॉलेजियम) 9 न्यायाधीशांची नावे सर्वोच्च न्यायालयासाठी निर्धारित करण्यात आली आहेत, असे वृत्त आहे. सर्वोच्च न्यायालयात एकंदर 34 न्यग्नायाधीश असतात. सध्या केवळ 25 न्यायाधीश कार्यरत आहेत. न्या, नरीमन हे 12 ऑगस्टला निवृत्त झाले आहेत. माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई 19 मार्च 2019 यग्ना दिवशी निवृत्त झाले. त्यानंतर कोणत्याही नव्या न्यायाधीशांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयात करण्यात आलेली नाही.
सर्वोच्च न्यायालयाच्यग्ना न्यायवृंदाचे नेतृत्व सरन्यायग्नाधीश करतात. या न्यायवृंदात न्या. यु. यु. लळित, न्या, ए. एम. खानविलकर, न्या. डी. वाय. चंद्रचूड आणि न्या. नागेश्वर राव हे अन्य न्यायाधीश आहेत. या न्यायवृंदाने सुचविलेल्या नावांमध्ये तीन महिला न्यायाधीशांचा समावेश आहे. तेलंगणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश हिमा कोहली, कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बी. व्ही. नागरत्ना आणि गुजरात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बेला त्रिवेदी अशी महिला न्यायाधीशांची नावे आहेत. याशिवाय, कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अभय ओक, गुजरात उच्च न्यायालयग्नाचे मुख्य न्यायाधीश विक्रम नाथ, सिक्कीम उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जीतेंद्र कुमार माहेश्वरी, केरळ उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सी. टी. रविकुमार आणि केरळ उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुंदरेश यांचा समावेश आहे. न्यायवृंदाने दिलेली सूची मान्य झाल्यास सर्वोच्च न्यायालयाची सर्व पदे भरली जातील. मात्र, बुधवारी न्या. नवीन सिन्हा निवृत्त झाल्याने आणखी एक पद रिक्त झाले आहे. ते नंतर विचारात घेतले जाईल.