कंत्राटदार व सरकारी अधिकाऱयांना लवकर काम पूर्ण करण्याचे दिले आदेश
विषेश प्रतिनिधी/ पर्वरी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व वीज मंत्री निलेश काब्राला यांनी काल अचानक पर्वरी येथे नवीन उभारण्यात येणाऱया उच्च न्यायालयाच्या ईमारतीची पाहणी करुन या विषयी महिती जाणून घेतली. येणाऱया 15 मार्चला या न्यायलयाचा ईमारतीचे अनावरण करण्यात येणार असल्याने जबाबदार कंत्रादार व इतर कामगारांना ईमारतीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.
पर्वरी येथे बांधण्यात आलेल्या या न्यायालयचा ईमारतीचे बांधकाम पूर्णत्वाकडे आले sअसून आता इतर कामे बाकी आहे. यासाठी काल मुख्यमंत्र्यांनी अग्नीशामक दलाचे sअधिकारी वन खात्याचे अधिकारी तसेच इतर जबाबदार खात्याच्या अधिकाऱयांना या ठिकाणी बोलावून त्यांना लवकरात लवकर त्यांची कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे. यावेळी कंत्राटदारासोबत या अधिकाऱयांना बोलावून कंत्राटदार व सरकारी अधिकाऱयांची म्हणणे मुख्यंमत्र्यांनी ऐकून घेतले. या ईमारतीसाठी लागणारी वीज, पाणी व्यवस्था तसेच वनखात्याचे लागणारे सर्व सोपोस्कर लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित अधिकाऱयांना दिले.
दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांनी पर्वरी येथे उच्च न्यायालची ईमारत बांधण्याची परवानगी दिले होती. गेली सहा वर्षे या ईमारतीचे बांधकाम सुरु आहे. या ईमारतीचे बांधकाम आता अंतीम टप्प्यात आले असून मार्च पर्यत या ईमातरीचे काम पूर्ण &करण्याचा हेतू सरकारचा आहे. यासाठी आता जलदगातीने कामाला सुरवात झाली असून यासाठी कंत्राटदार व सरकारी अधिकाऱयांना मुख्यमंत्र्यांनी कामे लवकर संपविण्याचे आदेश दिले आहे.