कोरोनामुळे न्यायालयीन कामकाज दोन वर्षे होते ठप्प
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनामुळे न्यायालयीन कामकाज तब्बल दोन वर्षे ठप्प झाले होते. ई-कोर्ट संगणकही बंद ठेवण्यात आले होते. मात्र आता मंगळवारपासून जेएमएफसी न्यायालयातील ई-कोर्ट संगणक सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
कोरोनामुळे न्यायालयीन कामकाज पूर्णपणे ठप्प झाले होते. अनेक खटल्यांचे निकाल लांबणीवर टाकण्यात आले होते. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून न्यायालयीन कामकाज पूर्ववत सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे आता टप्प्याटप्प्याने सर्व प्रक्रिया सुरू करण्याबाबत प्रशासनाने दखल घेतली आहे.
कोरोनामुळे ई-कोर्ट संगणक बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे वकील व पक्षकारांना आपल्या खटल्याबाबतची तारीख न्यायालयात जाऊनच तपासावी लागत होती. मात्र आता ई-कोर्ट संगणकावर बघणे सोयीचे झाले आहे.