बेळगाव : न्यायाधीशांना संरक्षण देण्यासाठी तसेच इतर कामांसाठी सिव्हिल पोलिसांचीच नियुक्ती केली जात आहे. मात्र त्यांच्यावर अधिक तणाव निर्माण होत आहे. एक तर पोलीस स्थानकांमध्ये काम करणे त्यानंतर न्यायाधीशांना संरक्षण देणे, यामुळे त्यांच्या कुटुंब व्यवस्थेवर त्याचा परिणाम होत आहे. तेव्हा न्यायालयीन कामकाजासाठी आणि न्यायाधीशांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र पोलीस व्यवस्था करावी, अशी मागणी काही वकील व सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
पोलीस स्थानकामध्ये विविध कामांसाठी पोलिसांना रात्रंदिवस जुंपले जात आहे. त्यांना सुटी दिली जात नाही. त्यामुळे पोलीस तणावाखाली येत आहेत. या उलट केएसआरपी किंवा जिल्हा राखीव दलाचे पोलीस काही मोजक्मयाच घटनांच्यावेळी तैनात केले जात आहेत. इतर वेळी त्यांना कोणतेच काम नसते. तेव्हा त्या पोलिसांना न्यायालयीन परिसरात नेमावे, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. हिंडलगा कारागृहात संशयित आरोपींना सोडण्यासाठीदेखील सिव्हिल पोलिसांचीच नेमणूक केली जाते. तेव्हा त्याबाबतही गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. न्यायालयीन कामकाजातील विविध कारणांसाठी विशेष पोलिसांची नेमणूक करावी, जेणेकरून नेहमी काम करणाऱया पोलिसांवरील ताण कमी होईल, असे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी ऍड. आर. ए. चचडी, ऍड. व्ही. एल. हुपरी, स्नेहल नाईक, ऍड. वर्षा जावळेकर यांच्यासह वकील व नागरिक उपस्थित होते.