शनिवारी अर्ज दाखल करण्यास होणार सुरुवात
प्रतिनिधी /बेळगाव
नोव्हेंबर महिन्यामध्ये सरकारी सुटय़ा अधिक आल्या आहेत. याचबरोबर न्यायालयालाही सुटी आहे. उच्च न्यायालयाने गुरुवारी आणि शुक्रवारीही सुटी जाहीर केली आहे. त्यामुळे न्यायालये दोन दिवस बंद राहणार आहेत. शनिवारी न्यायालयीन कामकाजाला सुरुवात होणार आहे. याचबरोबर निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्यादिवशी निवडणूक अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे.
न्यायालयाला सलग सुटी असल्यामुळे पक्षकारांना पुन्हा वाट पहावी लागणार आहे. बुधवारपासून शुक्रवारपर्यंत न्यायालयाला सुटी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता शनिवारी मोठी गर्दी होणार आहे. बेळगाव बार असोसिएशनची निवडणूक जाहीर झाली असून शनिवारपासून अर्ज दाखल केले जाणार आहेत. एकीकडे पक्षकारांची गर्दी आणि दुसरीकडे अर्ज दाखल करण्यास वकिलांची होणारी धावपळ यामुळे न्यायालय गजबजणार आहे.