नवी दिल्ली
ज्येष्ठ न्यायाधीशांच्या विरोधात सोशल मिडियावरुन अवमानकारक मजकूर प्रसिद्ध केल्याच्या आरोपाखाली येथे शुक्रवारी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. सीबीआयने ही कारवाई केली. गेल्या वर्षी 11 नोव्हेंबरला या संबंधात 16 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच आतापर्यंत 12 प्रथमदर्शनी अहवाल (एफआयआर) सादर करण्यात आले आहेत. या सर्वांवर आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे निमित्त करुन न्यायाधीशांच्या विरोधात आक्षेपार्ह मजकूर सोशल मिडीयावर पोस्ट केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. हे प्रकरण सीबीआयच्या हाती चौकशीसाठी देण्यात आले आहे.