परिसरात दुर्गंधी : दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
न्यायालयाच्या आवारात असलेले डेनेज चेंबर ब्लॉक होऊन त्याचे पाणी रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. तेंव्हा तातडीने चेंबरची दुरुस्ती करावी, अशी मागणी वकील व पक्षकारांतून होत आहे.
जेएमएफसी न्यायालयाच्या आवारात हे चेंबर आहे. या ठिकाणी दुचाकी पार्किंग केले जातात. याचबरोबर पक्षकारही त्या परिसरातच उभे असतात. मात्र गेल्या पाच ते सहा दिवसांपासून हा चेंबर ब्लॉक होऊन त्याचे पाणी उघडय़ावर पसरत आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. यामुळे या ठिकाणी उभे राहणे देखील कठीण झाले आहे. तातडीने याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
जेएमएफसी न्यायालयाचे आवार हे नेहमी गजबजलेले असते. त्याच ठिकाणी या चेंबरचे पाणी उघडय़ावर पडत आहे. तेंव्हा न्यायालय प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.