वृत्तसंस्था/ ऑकलंड
गेल्या आठ महिन्यांच्या कालावधीत संपूर्ण जगात कोरोना महामारीने आपली दहशत निर्माण केली आहे. या महामारीमध्ये लाखो लोकांचे बळी पडले आहेत. कोव्हिड-19 समस्येमुळे प्रत्येक क्षेत्राला नुकसानीला सामोरे जावे लागले याला क्रिकेटही अपवाद नाही. पण न्यूझीलंडचा मध्यमगती गोलंदाज बेन लिस्टर हा केव्हिड-19 मुळे बदलला जाणारा पहिला बदली क्रिकेटपटू ठरला आहे.
न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या प्लंकेट शिल्ड प्रथमश्रेणी क्रिकेट स्पर्धेत खेळणाऱया 26 वर्षीय मार्क चॅपमन याची प्रकृती बिघडली. चॅपमनची सोमवारी कोरोना चांचणी घेण्यात आली असून त्याचा अहवाल येईपर्यंत लिस्टरला खेळविण्यात येणार आहे. चॅपमनने यापूर्वी सहा वनडे आणि 24 टी-20 सामन्यात न्यूझीलंडचे प्रतिनिधीत्व केले आहे. आता चॅपमनच्या जागी लिस्टरची बदली खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.