वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
न्यूझीलंडचे माजी कसोटी क्रिकेटपटू मॅट पोरे यांचे वयाच्या 90 व्या वर्षी वृद्धापकालाने निधन झाले. 1955 साली बेंगळूरमध्ये झालेल्या सामन्यात मैदानावर प्रवेश केलेल्या श्वानाला पकडताना सदर श्वानाने त्यांचा चावा घेतल्याने त्यांना रॅबीसची 12 इंजक्शने घ्यावी लागली होती. ही पोरेच्या क्रिकेट कारकीर्दीतील लक्षवेधी घटना ठरली होती.
न्यूझीलंडचे मॅट पोरे यांना श्वान पाळण्याचा शोक होता. त्यामुळे ते नेहमीच कोणत्याही श्वानावर पेम करीत असत. 1955 साली न्यूझीलंडचा संघ भारताच्या दौऱयावर चार सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी आला होता. तत्कालीन बेंगळूरला कसोटी केंद्राचा दर्जा नव्हता त्यामुळे या दौऱयातील एक सरावाचा सामना बेंगळूरमध्ये आयोजित केला होता. त्यावेळी हैद्राबाद, दिल्ली, मुंबई, चेन्नाई या ठिकाणी कसोटी सामने खेळविले गेले होते. न्यूझीलंड संघात अष्टपैलू पोरे यांचा समावेश होता.
1953 ते 1956 या तीन वर्षांच्या कालावधीत न्यूझीलंड संघात दोन महान क्रिकेटपटू बर्ट सटक्लिफ आणि जॉन रीड खेळत होते. पोरे यांनी आपल्या कसोटी कारकीर्दीत 14 सामन्यांत 15.43 धावांच्या सरासरीने 355 धावा जमविल्या होत्या तर 1953 साली त्यांनी दक्षिण आफ्रिकेविरूद्ध ऑकलंडच्या कसोटीत सर्वाधिक वैयक्तिक 45 धावा जमविल्या होत्या. क्रिकेट न्यूझीलंडतर्फे पोरे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.