वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
न्यूझीलंड संघातील अष्टपैलू जिमी नीशम याला यापूर्वी दुखापत झाली होती. उजव्या हाताच्या बोटाचे हाड मोडल्याने या दुखापतीवर शनिवारी डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली.
अलिकडच्या कालावधीत सूर मिळविण्यासाठी नीशमचे प्रयत्न चालू होते. गेल्यावर्षी झालेल्या आयपीएल स्पर्धेत नीशम सूर मिळविण्यासाठी झगडत होता. शनिवारी झालेल्या शस्त्रक्रियेनंतर नीशमला आणखी काही दिवस विश्रांती घ्यावी लागेल. न्यूझीलंडमध्ये सध्या सुपर स्मॅश क्रिकेट स्पर्धेत नीशम पुनरागमन करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. टी-20 प्रकारात नीशमची कामगिरी समाधानकारक असून त्याने 12 कसोटी, 63 वनडे आणि 24 टी-20 सामन्यांत न्यूझीलंडचे प्रतिनिधीत्व करताना अनुक्रमे 709, 1286 आणि 250 धावा जमविल्या आहेत. गोलंदाजीत त्याने या तिन्ही क्रीडा प्रकारात 90 पेक्षा अधिक बळी मिळविले आहेत. गेल्यावर्षी आयपीएल स्पर्धेत नीशम किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळत होता.