ऑनलाईन टीम / ऑकलंड :
जगात पहिल्यांदा कोरोनामुक्त झालेल्या न्यूझीलंडमध्ये पुन्हा एकदा लेव्हल दोनचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तर ऑकलंड शहरात बधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने तेथे उद्यापासून (दि.28) सात दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्याची माहिती न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी दिली.
आर्डन म्हणाल्या, ऑकलंडमध्ये या महिन्यात तीन दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला होता. मात्र, बाधितांची संख्या वाढत असल्याने पुन्हा सात दिवस हे शहर लॉकडाऊन करण्यात येणार आहे. ऑकलंड व्यतिरिक्त देशातील उर्वरित भागात सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे.
दरम्यान, न्यूझीलंडने 8 जून रोजी देश कोरोनामुक्त झाल्याची घोषणा केली होती. देशात एकही कोरोना रुग्ण नसल्याने न्यूझीलंडने कोरोना विषाणूला रोखण्यासाठी लागू केलेले देशांतर्गत सर्व निर्बंध हटवले होते. त्यानंतर 24 दिवसानंतर तेथे 2 बाधित रुग्ण आढळून आले होते.