ऑनलाईन टीम / मुंबई :
बीसीसीआयने मंगळवारी सकाळी न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी संघासाठीची घोषणा केली. सलामीवीर रोहित शर्माला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली आहे. आता त्याच्या जागी पृथ्वी शॉला संधी देण्यात आली आहे.
तर शुभमन गिल, ईशांत शर्मालाही संघात स्थान देण्यात आले आहे. मात्र, केएल राहुलला टेस्ट सीरीजमध्ये घेण्यात आलेलं नाही.
असा आहे भारतीय संघ :
विराट कोहली (कर्णधार), मयांक आगरवाल, पृथ्वी शॉ, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य राहणे (उप कर्णधर), हनुमा विहारी, वृद्धीमान साहा (यष्टीरक्षक), रिषभ पंत (यष्टीरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, जसप्रित बुमराह, उमेश यादव, मोहम्मद शमी, नवदीप सैनी व ईशांत शर्मा.