ऑनलाईन टीम / वेलींग्टन :
चीनचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार असलेल्या न्यूझीलंडनेही हाँगकाँगसोबतचा प्रत्यार्पण करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हाँगकाँगमध्ये नवा कायदा लागू करून चीनने आंतरराष्ट्रीय समुदायाला दिलेल्या वचनाचा भंग केल्याने हा निर्णय घेतल्याचे न्यूझीलंडचे परराष्ट्रमंत्री विन्स्टन पीटर्स यांनी म्हटले आहे.
पीटर्स म्हणाले, चीनने हाँगकाँगमध्ये नवा राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू केल्यानंतर ‘फाइव्ह आइज’मधील अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या चारही देशांनी हाँगकाँगसोबतचे प्रत्यार्पण करार रद्द केले होते. मात्र, चीन आणि न्यूझीलंडचे व्यापारी संबंध चांगले असल्याने चीनने अद्याप चीनचा न्यूझीलंडबरोबर थेट संघर्ष झाला नव्हता. मात्र, आता न्यूझीलंडनेही हाँगकाँगसोबतचा प्रत्यार्पण करार रद्द करत असल्याचे जाहीर केले.
न्यूझीलंडच्या या निर्णयाचा चीनला मोठा धक्का बसला आहे. कारण चीन आणि न्यूझीलंड यांच्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात व्यापार होतो. चीन अब्जावधी रुपयांचा शेतमाल दरवर्षी न्यूझीलंडकडून आयात करतो.