वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाने शनिवारी दोन सामन्यांची कसोटी मालिका आणि आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशीपमधील अंतिम लढतीसाठी लंडनला प्रयाण केले.
इंग्लंडच्या दौऱयात न्यूझीलंड संघाचा तीन दिवसांचा सरावाचा सामना साऊदम्पटन येथे आयोजित केले आहे. न्यूझीलंडचा संघ यजमान इंग्लंडविरूद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. हे कसोटी सामने लंडन आणि बर्मिंगहॅम येथे खेळविले जातील. उभय संघातील पहिली कसोटी 2 जूनपासून सुरू होईल. आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेतील अंतिम लढत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18 ते 22 जून दरम्यान रोज बाऊल येथे आयोजित केली आहे. या अंतिम सामन्यापूर्वी सरावासाठी न्यूझीलंड संघातील खेळाडूमध्ये तीन दिवसांचा सरावाचा सामना होणार आहे.
विश्व कसोटी चॅम्पियन्सशीप स्पर्धेतील अंतिम सामना अनिर्णित किंवा टाय झाल्यास दोन्ही संघांना संयुक्त विजेते म्हणून जाहीर केले जाईल. या अंतिम सामन्यासाठी आयसीसीच्या नियंत्रण समितीने 23 जून हा राखीव दिवस ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.