अनफिनिश्ड पुस्तकाला मिळाला मान, दिग्गज कलाकारांनी केले अभिनंदन
अभिनेत्री प्रियांका चोप्राने 9 फेब्रुवारी रोजी स्वतःचे आत्मचरित्र ‘अनफिनिश्ड’ सादर केले होते. या पुस्तकात प्रियांकाने स्वतःच्या वैयक्तिक तसेच व्यावसायिक जीवनाशी निगडित अनेक बाबी मांडल्या आहेत. प्रियांकायच या पुस्तकाला चाहत्यांची मोठी पसंती मिळत आहे. प्रियंकाच्या अनफिनिश्ड या पुस्तकाचे मुख्यपृष्ठ न्यूयॉर्कच्या 6 मजली बिलबोर्डवर झळकले आहे. याप्रकरणी प्रियांकाने आनंद व्यक्त केला आहे.
महिलांच्या आवाजा धार देण्यासाठी या विमेन्स हिस्ट्री मंथच्या उत्सवात सामील झाल्याने अत्यंत उत्साही असल्याचे प्रियांकाने समाजमाध्यमांवर म्हटले आहे. प्रियांकाच्या या कामगिरीवर तिचे चाहते, कुटुंबीय आणि मित्रही समाजमाध्यमांवर अभिनंदन करत आहेत. प्रियांकाने अलिकडेच न्यूयॉर्क शहरात ‘सोना’ नावाने एक भारतीय रेस्टॉरंट सुरू केले आहे.