न्यूयॉर्क : न्यूयॉर्क शहराच्या एका अपार्टमेंटमध्ये आग लागल्याने 9 मुलांसह 19 जणांचा मृत्यू ओढवला आहे. रविवारी सकाळी (अमेरिकेतील प्रमाणवेळ) न्यूयॉर्कच्या ब्रोंक्स अपार्टमेंटमध्ये झालेल्या या भीषण दुर्घटनेत सुमारे 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत. या जखमींना 5 विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. एकूण जखमींपैकी 12 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. तर अपार्टमेंटच्या प्रत्येक मजल्यावर राहत असलेले लोक या आगीमुळे प्रभावित झाले. धूरामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. फायर डिपार्टमेंटचे आयुक्त डॅनियल नीग्रो यांच्यानुसार ही दुर्घटना रविवारी सकाळी सुमारे 11 वाजता घडली आहे. ही आग रुम हीटरमुळे लागली असण्याची शक्यता न्यूयॉर्क शहराच्या महापौर एरिक ऍडम्स यांनी व्यक्त केली आहे. महापौरांनी या दुर्घटनेला शहरातील सर्वात भीषण दुर्घटना ठरविले आहे.
Previous Articleआपण सारेच पोटार्थी !
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.