चालू आठवडय़ात संमत होणार विधेयक
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
अमेरिकेतील न्यूयॉर्क प्रांतात दीर्घकाळापासून राहिलेली भारतीय समुदायाची दिवाळीनिमित्त शाळांमध्ये सुटी देण्याची मागणी पूर्ण होणार आहे. न्यूयॉर्क विधिमंडळात भारतीय वंशाच्या पहिल्या महिला सदस्या राजकुमार यांनी यासंबंधी विधेयक मांडले आहे. व्यापक समर्थन पाहता हे विधेयक सहजपणे संमत होणे निश्चित आहे.
अशाप्रकारचे विधेयक न्यूयॉर्क प्रांताचे सिनेटर केविन थॉमस यांनी प्रांत स्तरावर सादर पेल आहे. केविन प्रांतात एकमात्र भारतीय वंशाचे सिनेटर आहेत. विधेयक संमत होताच पूर्ण अमेरिकेतही दिवाळीवेळी सुटीचा मार्ग मोकळा होणार आहे. यंदा न्यूयॉर्कच्या प्रतिष्ठित एम्पायर स्टेट बिल्डिंग दिवाळीवळी नारिंगी रंगात चमकणार आहे.
या प्रांतात भारतीय-अमेरिकनांची संख्या वाढत आहे. दिवाळीवेळी सुटी घोषित करण्यासाठी अनेक प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. येथे दिवाळी साजरी करणाऱया समुदायांची पुरेशी संख्या आहे. त्यांच्या सन्मानार्थ प्रांताचे अधिकारी त्यावेळी शाळांमध्ये सुटी घोषित करण्याचा विचार करत असल्याची माहिती न्यू जर्सीच्या शिक्षण विभागातील कर्मचारी मार्क रोवेलो यांनी दिली आहे.
दिवाळीला व्हाइट हाउसने यापूर्वीच सण म्हणून मान्यता दिली आहे. माजी अध्यक्ष बराक ओबामा आणि आणि त्यांचे उत्तराधिकारी डोनाल्ड ट्रम्प दोघांनीही व्हाइट हाउसमध्ये दिवाळीचा सण साजरा केला आहे. अमेरिकेने 2016 मध्येच दिवाळीनिमित्त टपाल तिकीट सादर केले होते.
न्यूयॉर्कमध्ये भारतीयांचे प्रमाण अत्यंत अधिक आहे. तेथे 7 लाख 11 हजार 174 भारतीयांचे वास्तव्य आहे. न्यूयॉर्कच्या अनेक मतदारसंघांमध्ये भारतीय-अमेरिकनांचे प्रमाण 8 टक्क्यांपर्यंत आहे. सर्वसाधारणपणे न्यूयॉर्क प्रांताच्या निर्णयाचे अनुकरण अन्य प्रांतही करत असतात. याचमुळे न्यू जर्सी, पेन्सिल्वेनिया यासारखे अनेक प्रांतही दिवाळीची सुटी घोषित करण्याचा विचार करत आहेत.