ऑनलाईन टीम / न्यूयॉर्क :
काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील वाघिणीला कोरोनाची लागण झाल्याची बातमी आली होती. मात्र, आता वाघिणी ची मावशी समजल्या जाणाऱ्या मांजरीला ही कोरोनाची लागण झाल्याची माहिती येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, न्यूयॉर्कमधील दोन मांजरींना कोरोनाची बाधा झाली आहे. या मांजरी न्यूयॉर्क मधील वेगवेगळ्या भागातील असून दोघांना श्वसनाच्या आजारामुळे पशुवैद्याकडे नेण्यात आले होते. त्यावेळी उपचारा दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. दोघांवरही उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
पहिली मांजर ज्या घरातून आली त्या घरातील कोणालाही कोरोनाची लक्षणे नव्हती. मात्र, दुसऱ्या मांजरीच्या घरातील मालकामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत.
दरम्यान, या दोन्ही मांजरींना न्यूयॉर्क मधील प्राणी संग्रहालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे.