ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेने न्यूयॉर्कच्या स्टॉक एक्स्चेंजमधून चीनच्या तीन दूरसंचार कंपन्यांना हटवण्याची घोषणा केली आहे. चीनच्या विस्तारवादी भूमिकेला चाप लावण्यासाठी अमेरिकेने हे पाऊल उचलले आहे.
चायना टेलिकॉम कॉर्पोरेशन लिमिटेड, चायना मोबाईल लिमिटेड आणि चायना युनिकॉम हाँगकाँग अशी या चिनी दूरसंचार कंपन्यांची नावे आहेत. या कंपन्यांची मालकी चिनी सैन्याकडे असल्याचा अमेरिकेचा दावा आहे. त्यामुळे या कंपन्यांचे शेअर 7 ते 11 जानेवारीदरम्यान कोणत्याही क्षणी बंद करण्यात येतील, असे अमेरिकेने म्हटले आहे.