प्रतिनिधी / पुणे :
न्यूहॉलंड ऍग्रिकल्चर इंडिया या यांत्रिकीकरण उपायांची प्रगत रेंज पुरविणाऱया देशातील ब्रँडने आपला पाच लाखा ट्रक्टर निर्मितीचा टप्पा पार केला आहे. 1,000 हून अधिक ग्राहक विक्री सेवा-संपर्क केंद्रांच्या वाढत्या जाळय़ाद्वारे, न्यूहॉलंडने बाजारपेठेतील प्रगती आणि लोकप्रियता या दोन्ही दृष्टिने आपली आघाडीची स्थिती आणखी बळकट केली आहे.
याप्रसंगी बोलताना कंपनीचे विक्री विभागाचे संचालक कुमार बिमल म्हणाले, आमच्या ग्राहकांच्या वाढत्या संख्येद्वारे आमच्यावर असलेला विश्वास आम्ही सार्थ ठरविला आहे. 5 लाख ट्रक्टर्सची निर्मिती एक प्रचंड यश आहे, त्यामुळे आमच्या वृद्धिची क्षमता पुन्हा सिद्ध झाली आहे आणि आमच्या शेतकऱयांना सर्वात आधुनिक उपाय उपलब्ध करुन देण्यासाठी आगामी उत्पादन रेंजमध्ये नवनवीन तंत्रज्ञान समाविष्ट करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळत आहे. यासाठी आगामी काळात कंपनी प्रयत्न करणार असल्याचे नमूद केले आहे.