ऑनलाईन टीम / पुणे :
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोडचा 141 वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सोसायटीचे कार्यवाह धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
विद्यार्थ्यांचा बौध्दिक, शारीरिक, मानसिक, आत्मिक, सामाजिक आणि कौशल्य विकास हे शिक्षणाचे कार्य आहे. व्यक्तिमध्ये असलेल्या उत्तम गुणांचे प्रगटीकरण हे शिक्षणाचे साध्य आहे. विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास महत्त्वाचे आहे. असे मत कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
शाळेने ऑनलाईन पद्धतीने शिक्षण, विद्यार्थी निवडणुका आणि स्नेहसंमेलन साजरे केल्याची माहिती प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनिषा मिनोचा यांनी दिली. शाला समितीचे अध्यक्ष खेमराज रणपिसे, सदस्य डॉ. विनय आचार्य, उपशाला प्रमुख दीपा अभ्यंकर, पालक-शिक्षक संघाच्या सहकार्यवाह सुकेशिनी खवळे, विद्यार्थी प्रतिनिधी वैष्णव जाधव, प्रणिता विधाते यांची प्रमुख उपस्थिती होती.