नंदगड / वार्ताहर
न्यू नवहिंद मल्टीपर्पज मल्टिस्टेट सोसायटीच्या नंदगड शाखेचा बारावा वर्धापन दिन सोसायटीच्या कार्यालयामध्ये नुकताच झाला. फोटोपूजन रमेश कब्बूर व गोपाळ बेळगावकर यांनी केले. दीपप्रज्वलन उद्योजक विठ्ठल पारिश्वाडकर व जीवन पारिश्वाडकर यांनी केले.
यावेळी संस्थेचे डि.ओ. सी. जी. पाटील यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. नंदगड शाखेचे व्यवस्थापक संजीव कुलकर्णी यांनी आभार मानले. यावेळी कर्मचारी प्रतिभा चौगुले, रेश्मा बिडकर, विजय बिडकर आदी उपस्थित होते.