दोघांची बिनविरोध निवड झाल्याने समाधान
वार्ताहर / काकती
न्यू वंटमुरी ग्राम पंचायत अध्यक्षपदी महादेवी चौगुला तर उपाध्यक्षपदी रामाप्पा हंचिनमनी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
न्यू वंटमुरी ग्रा. पं. च्या कार्यक्षेत्रात सुतगट्टी, परशानट्टी, मरणहोळ, हालभावी, उक्कड, बबनट्टी, भुतरामट्टी आदी गावांचा समावेश असून ग्रा. पं. सदस्य संख्या 32 आहे. समाजातील सर्व घटकांना ग्राम पंचायत चालविण्यासाठी संधी मिळण्यासाठी यंदा शासनाच्या धोरणानुसार अध्यक्षपद सामान्य महिला तर उपाध्यक्षपद सामान्य पुरुषासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. अध्यक्षपदासाठी महादेवी मारुती चौगुला तर उपाध्यक्षपदाकरिता रामाप्पा आप्पाण्णा हंचिनमनी यांचे यांचे एकमेव अर्जदाखल झाल्याने यांचे बिनविरोध निवड करण्यात आली
आहे.
निवडणूक अधिकारी म्हणून लघु पाटबंधारे खात्याचे अभियंता एम. बी. बिरासदार-पाटील यांनी काम पाहिले. तर ग्राम विकास अधिकारी पूनम गडगे यांनी अधिकारपदाची सूत्रे घेऊन अभिनंदन केले. यावेळी नूतन ग्रा. पं. सदस्य उपस्थित होते.