महिला, एक मुलगा गंभीर जखमी झाल्याची माहिती : डिचोली पोलीसनी केला पंचनामा
सांखळी/प्रतिनिधी
सांखळी मतदारसंघातिल सुर्ल-न्हावेली मुख्य रस्त्यावर आज संध्याकाळी काळोखात एक ट्रक उA04 ऊ 3494 आणि दुचाकी उA03 Aऱ 8624यात भीषण अपघात होऊन एक महिला गंभीर जखमी झाल्याची माहिती उपलब्ध झालीआहे डिचोली पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला
उपलब्ध माहिती नुसार एका खाण कंपनीचा खनिज माल घेऊन आलेल्या या ट्रकचा चालक विचित्र प्रकारे ट्रक चालवत होता, तो दारू पिऊन गाडी चालवत होता असा अंदाज कांही नी व्यक्त केला, सुर्ल ते न्हावेली या मुख्य रस्त्यावर त्यानें अनेक ठिकाणी धडक दिल्याचे बोलले जात आहे, अश्या दारुडय़ा वाहन चालकाला कडक शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी कांही वाहन चालकांनी केली आहे