प्रतिनिधी / सातारा
पंकज चव्हाण हे पदाच्या माध्यमातून कला सांस्कृतीक क्षेत्रांतील जास्तीत जास्त प्रश्न मार्गी लावतील हा विश्वास आहे, असे गौरवोद्गार विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
या प्रसंगी राजमाता श्रीमंत छ. कल्पनाराजे भोसले यांच्या उपस्थितीत पंकज चव्हाण यांचा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे गौरव केला, त्यावेळी ते बोलत होते. सातारा जिल्ह्यातील सांस्कृतीक क्षेत्रात नावारुपास आलेल्या तसेच युवकांना विविध कला क्षेत्रात दारे खुली करुन देणारे खा. श्रीमंत छ.उदयनराजे महाराज यांचे कट्टर समर्थक पंकज चव्हाण यांच्या लोककार्याची दखल भाजपने घेतली असुन, त्यांना जास्तीत जास्त तळागाळापर्यंत पोहोचता यावे, महाराष्ट्राच्या कला-सांस्कृतीक क्षेत्रांतील प्रश्न तडीस नेता यावे म्हणुन पंतप्रधान नरेंद्र मोदी व खा. श्रीमंत छ.उदयनराजे यांच्या आशीर्वादाने व महाराष्ट्र विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनांने पंकज चव्हाण यांची भारतीय जनता पार्टी सांस्कृतीक प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेशच्या महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक तथा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
त्यांच्या नियुक्तिचे पत्र भाजपा सांस्कृतीक प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश संयोजक ॲड. शैलेश गोजमगुंडे यांनी प्रसिद्ध केले. त्या बद्द्ल विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला, शूरविर आणि योद्यांसोबत महाराष्ट्राला कला संस्कृतीचीही पार्श्वभूमी आहे. विविध कला सांस्कृतीक क्षेत्रातील कलावंत, कलाकार आणि त्या सलग्न व्यवसायिक काम करत आहेत, या पदाच्या माध्यमातून कला सांस्कृतीक क्षेत्रातील जास्तीत जास्त प्रश्न मार्गी लावा अशी सदिच्छा व ही महाराष्ट्र प्रदेशाची दिलेली जवाबदारी नक्कीच उत्तमपणे पार पाडु शकता आसा वि्श्वास विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यानी व्यक्त केला.