सोलापूर : सोलापूरच्या दाते पंचांगाला शंभर वर्षांची परंपरा आहे. पंचांगकर्ते धुंडिराजशास्त्री दाते यांच्या नंतर त्यांच्या कार्याची धुरा त्यांचे पुत्र मोहनराव दाते पुढे नेत आहेत. ज्योतिषदिनाच्या निमित्ताने तरुण भारत संवादच्या वतीने विद्यमान पंचांगकर्ते मोहनराव दाते यांचा सत्कार आवृत्तीप्रमुख रजनीश जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी सौ. वीणा दाते, सौ. रश्मी वळसंगकर, सौ. मयुरी दाते उपस्थित होत्या. ’अद्वैताचे विज्ञान’ असे संबोधल्या जाणाऱया ज्योतिषशास्त्रावर आजही लाखोजणांचा विश्वास आहे. भारतीय परंपरेत गुढीपाडव्यापासून सुरू होणाऱया नव्या वर्षात कोणत्या आनंदाच्या आणि आव्हानाच्या घटनांना सामोरे जावे लागणार आहे याची माहिती नव्या वर्षाच्या पंचांगातून घेतली जाते. त्यासाठी गावोगावी पंचांगाचे वाचन केले जाते. अनेकांना धनधान्य, कृषी आणि पावसाबद्दलची भाकिते जाणून घेण्याची उत्सुकता आजही कायम आहे. मोहनराव दाते यांनी पंचांगाची परंपरा पुढे नेली आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा वापर करून पुढच्या पिढीसाठी पंचांगाचे दालन त्यांनी खुले केले आहे. विवाहाच्या मुहुर्तापासून गृहप्रवेशादी शुभकार्यासाठी दाते पंचांग पाहणारे लोक जगभरात आहेत. शाल, श्रीफळ, तरुणभारत संवादचा दीपावली अंक आणि पुष्पगुच्छ, पेढे असे श्री. दाते यांच्या सत्काराचे स्वरूप होते.
Previous Articleडिचोली शिमगोत्सव समितीच्या शिमगोत्सवाचा निकाल जाहीर
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.