ऑनलाईन टीम / चंदीगड :
हरियाणामध्ये होणाऱ्या पंचायती राज निवडणुकीमध्ये आता महिलांना 50 टक्के आरक्षण मिळणार आहे. असा निर्णय हरियाणा सरकारने घेतला आहे. ही व्यवस्था 2021 मध्ये होणाऱ्या पंचायती राज निवडणुकीत सुरू केली जाणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी दिली.
ते म्हणाले, भाजप – जजपा विधायक दल यांनी याला सहमती दर्शवली आहे. कॅबिनेट मंजूरीनंतर सरकार विधानसभेच्या आगामी सत्रात विधायक मंजूर करून 50 टक्के आरक्षणाचा कायदा तयार करेल. पंचायती राज संस्थेमध्ये महिलांना हे आरक्षण मिळाल्यास ग्रामीण विकास वेनागे होण्यास मदत होईल.
दरम्यान, संपूर्ण देशात दोन तृतीयांश भागात पंचायती राज निवडणुकीमध्ये 50 टक्के आरक्षण पहिल्यापासूनच आहे. हरियाणाच्या शेजारील राज्यात देखील ही व्यवस्था आहे. त्यानंतर आता हरियाणा सरकारचे देखील यासाठी प्रयत्न सुरू आहेत. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 100 महिला प्रतिनिधींना स्कूटी देणार आहे. यातील 10 जिल्हा परिषद सदस्य, 20 ब्लॉक समिती सदस्य, 40 वार्ड सदस्य आणि 30 सरपंच सहभागी होतील.