प्रतिनिधी /पणजी
पंचायत वॉर्डांचे पुनर्रचना करण्यात आलेले प्रस्ताव व त्यांचा मसुदा निवडणूक नोंदणी अधिकारी कार्यालयात तसेच संबंधित पंचायत कार्यालयात तलाठीकडे येत्या 2 मार्च 2022 पर्यंत उपलब्ध करण्यात आला आहे. त्याकरीता जनतेने सूचना, बदल, सुधारण यांची नेंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
सदर प्रस्ताव शनिवारी 26 फेब्रुवारी, रविवारी 27 फेब्रुवारी असे दोन दिवस वरील दोन्ही कार्यालयात जनतेला पहाणीसाठी खुले ठेवण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.