वार्ताहर / सांगरूळ
कोरोना विषाणूच्या प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी गावोगावी अंगणवाडी सेविकांच्या मार्फत सर्वेक्षणाचे काम सुरू असून या कामकाजातून 45 वर्षावरील अंगणवाडी सेविकांना वगळावे अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य सुभाष सातपुते यांनी एका पत्राद्वारे पालक व मंत्री नामदार सतेज पाटील यांच्याकडे केली आहे. सध्या देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाने सर्वत्र थैमान घातले असून या विषाणूच्या प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने संचारबंदी लागू केली असून या आदेशाची अंमलबजावणी जिल्हा तालुका व गाव पातळीवर काटेकोरपणे सुरू आहे .
गाव पातळीवर अंगणवाडी सेविका ,आशा व शिक्षक शिक्षिका यांच्यामार्फत दररोज घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचे काम सुरू आहे .या अंगणवाडी सेविकांच्या मध्ये ४५ वर्षाच्या वरील वयाच्या अंगणवाडीसेविका ही सर्वेक्षणाचे काम करत आहेत .सध्याच्या क** उन्हाळ्यामुळे या अंगणवाडी अंगणवाडी सेविकांना गावातून फिरून सर्वेक्षणाचे काम करताना त्रास सहन करावा लागत आहे . शासनाने पंचेचाळीस वर्षे वयाच्या वरील शिक्षक शिक्षकांना या कामातून वगळले आहे .याप्रमाणेच सर्वेक्षणाच्या कामात असलेल्या पंचेचाळीस वर्षे वयाच्या वरील अंगणवाडी सेविकाना सर्वेक्षणाच्या कामकाजातून वगळावे .अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य सुभाष सातपुते यांनी पालकमंत्री नामदार सतेज पाटील यांची भेट घेऊन केली आहे .यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील उपाध्यक्ष सतीश पाटील उपस्थित होते.