ऑनलाईन टीम/तरुण भारत
देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला असून निवडणूक आयोगाने तारखाही जाहीर केल्या आहेत. उत्तर प्रदेश, गोवा नंतर काँग्रेसने आता पंजाबमध्ये विधानसभेची आपली पहिली यादी जारी केली आहे. पहिल्या यादीत मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नवजोत सिंह सिद्धू, अभिनेते सोनू सुद यांची बहिण मालविका यांना उमेदवारी दिली आहे.
काँग्रेसने पंजबमध्ये आज आपली पहिली 86 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी हे चमको साहिब या ठिकाणाहून निवडणूक लढवणार आहेत. तर नवजोत सिंह सिंद्धू यांनी अमृतसर येथून उमेदवारी देण्यात आली आहे. तर अभिनेते सोनू सुद यांनी बहिण मालविका हिला मोगा येथील उमेदवारी देण्यात आली. तर गायक सिंद्धू मूसेवाला यांना मानसा येथून उमेदवारी देण्यात आली आहे. तर तर कादियातून प्रताप सिंह बाजवा, पठानकोटमधून अमित विज आणि दीनानगर येथून अरुणा चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
बलबीर सिंद्धू हे मोहाली येथून मैदानात उतरणार आहेत. तर कॅप्टन अमरिंदर सिंहचे जवळचे नातेवाईक असलेले कॅप्टन संदीप संधू यांना देखील काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे. तर मलोटचे आमदार आणि विधानसभा अध्यक्ष अजब सिंह भट्टी यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्याजागी आम आदमी पार्टी सोडून काँग्रेसमध्ये येणाऱ्या रुपिंदर कौर रुबी यांनी तिकीट देण्यात आले आहे.