महाराष्ट्राचे महेंद्र चव्हाण व सुजन पालनकर यांना उपविजेतेपद, महाराष्ट्र सांघिक विजेतेपदाचा मानकरी
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
सिक्कीम येथील गंगटोक येथे इंडियन शरीरसौष्ठव फेडरेशन व सिक्कीम शरीरसौष्ठव फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 11 व्या फेडरेशन चषक राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत पंजाबच्या हरदीप सिंग याने ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ किताब मिळविला. महाराष्ट्राच्या महेंद्र चव्हाण याने चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सचे पहिले उपविजेतेपद तर महाराष्ट्राच्याच सुजन पालनकरने चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सचे दुसरे उपविजेतेपद पटकाविले. उत्कृष्ट पोझर म्हणून इंडियन पोस्टचा एस. कृष्णराव, मोस्ट इम्पूव्ह्ड शरीरसौष्ठव म्हणून आशिष लोखंडे (महाराष्ट्र) यांना बहुमान मिळाला. 220 गुणांसह महाराष्ट्र संघाने सांघिक विजेतेपद, 160 गुणांसह ओडिशाने पहिले उपविजेतेपद तर 150 गुणांसह पंजाबने दुसरे उपविजेतेपद पटकाविले.
सिक्कीम येथे झालेल्या या स्पर्धेत आयबीबीएफच्या नियमानुसार वजनी गटात स्पर्धा घेण्यात आली.
निकाल पुढीलप्रमाणे -55 किलो गट 1) नितेशकुमार बैरके ओडिशा, 2) सुरजसिंग उत्तराखंड, 3) एस. कृष्णराव इंडियन पोस्ट, 4) निखील मेहरा राजस्थान, 5) रवी अगरवाल यूपी.
60 किलो गट -1) सय्यद अखिलुद्दीन तेलंगना, 2) द्यालीम शेख गुजरात, 3) शिवानंद बॅनर्जी झारखंड, 4) गौरव डोगरा जम्मू-काश्मिर, 5) रंजनकुमार बिहार.
65 किलो गट1) प्रदीपकुमार वर्मा पंजाब, 2) शशांक शाहू ओडिशा, 3) अशोक बेहरा छत्तीसगड, 4) संदीप स्वाली महाराष्ट्र, 5) इ. निशांत तामिळनाडू.
70 किलो गट-1) सुदीप बैद्य आसाम, 2) राव बिलाल सेंट्रल रेव्हेन्यू, 3) अमितकुमार भुयान ओडिशा, 4) दिलीपकुमार दिल्ली, 5) निरजकुमरा रेल्वे.
75 किलो गट-1) जगन्नाथ कुठे ओडिशा, 2) डब्लू किरणसिंग मणिपूर, 3) विपीन शर्मा चंदीगड, 4) शेख सैफुल्ला आंध्रप्रदेश, 5) तीर्थगोपाल भंडारी पं. बंगाल.
80 किलो गट-1) आशिष लोखंडे महाराष्ट्र, 2) भुपेंद एन. मणिपूर, 3) बबलुसिंग रावत राजस्थान, 4) बिजॉय गोराज पं. बंगाल, 5) नवीन दिल्ली.
85 किलो गट-1) रासीम राजन साहू इंडियन पोस्ट, 2) कोतेंजम अरनॉल्डसिंग मणिपूर, 3) नबजतदास आसाम, 4) राम टूडू सीआरपीएफ, 5) नित्यानंद कोटीयन कर्नाटक.
90 किलो गट-1) सुजन पालनकर महाराष्ट्र, 2) देवेंद्र पाल उत्तरप्रदेश, 3) शोएब खान राजस्थान, 4) निलकंठ घोष प. बंगाल, 5) नगानगोम सुरेशचंद्र सिंग मणिपूर. 90-100 किलो गट-1) महेंद्र चव्हाण महाराष्ट्र, 2) सुखदीपसिंग पंजाब, 3) मेल्सन नोनगीकलम मणिपूर, 4) युद्धबीर हरियाना, 5) प्रशांतकुमार सिंग झारखंड.
100 वरील गट-1) हरदीपसिंग पंजाब, 2) निलेश दागडे महाराष्ट्र, 3) गणेश आहिरे राजस्थान, 4) विनयकुमार दिल्ली, 5) अमरिंदरसिंग पंजाब.
पुरूष स्पोर्ट्स फिजिक्स 165 सेंमी पर्यंत 1) सानी रॉय पं. बंगाल, 2) किरण लाड महाराष्ट्र, 3) हिमान्शु गुडीयाल उत्तराखंड, 4) सात्विक पटनायक ओडिशा, 5) सारिल रॉय सिक्कीम.
पुरूष स्पोर्ट्स फिजिक-1) ललीत लोढे उत्तराखंड, 2) पुपूनकुमार स्वैन ओडिशा, 3) युवराज जाधव महाराष्ट्र 4) पंकज रावत चंदीगड, 5) कुणाल वर्मा जम्मू-काश्मिर.
महिला खुला गट-1) गीता सानी हरियाणा, 2) सुप्रिती आचारजी छत्तीसगड, 3) करिष्मा चिंगगनबम मणिपूर, 4) प्रतिभा तापियल उत्तराखंड, 5) नंदीता रावत दिल्ली. महिला फिटनेस फिजिक खुला गट- 1) सोनिया मेत्रा पं. बंगाल, 2) किर्ती चानू तेलंगना, 3) पल्लवी जैस्वाल पं. बंगाल, 4) शिबानी दास ओडिशा, 5) निशारानी पारेख महाराष्ट्र.
वुमेन्स मॉडेल फिजिक-1) सोनिया मेत्रा पं. बंगाल, 2) रिटा देवी चंदीगड, 3) लीलि हस्नू नागालँड, 4) सुरभी शर्मा नागालँड, 5) प्रियांका थापा उत्तराखंड. 155 सेंमी पर्यंत-1) संजुरानी रेल्वे, 2) अंकिता गान पं. बंगाल, 3) योगिता सिंगर उत्तरप्रदेश, 4) हिलांग याजीक अरूणाचल प्रदेश 5) थाजा शिराम मणिपूर.
या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय पंच अजित सिद्दण्णावर, जे. निलकंठ, जे. शर्मा, जे. डी. भट्ट आदींनी काम पाहिले.