ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पंजाबमधील गुरुदासपूर येथे भारत-पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर असणाऱ्या रावी नदीतून 64 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे.
गुरुदासपूरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवरून वाहणार्या रावी नदीतील पाण्यात उगवणार्या कंदयुक्त वनस्पतीमध्ये लांब कापडी नळ्यांचा वापर करून 60 पाकिटांमध्ये 64.33 किलो हेरॉईन लपविण्यात आले होते. डेरा बाबा नानकजवळील नांगली येथील चौकीवर तैनात असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांच्या हा प्रकार निदर्शनास आला.
लपविलेले अंमली पदार्थ पाकिस्तानच्या बाजूने पाण्यात लोटण्यात आले होते. नदीकाठावरून हे अंमली पदार्थ सहज खेचता यावेत यासाठी लांब दोरखंड बांधण्यात आले होते. सीमा सुरक्षा दलाने कारवाई सुरू केल्यानंतर तस्करांनी पळ काढल्याचे सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.