ऑनलाईन टीम / चंदीगढ :
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात समाविष्ट झालेल्या मंत्र्यांच्या आज दुपारी 4.30 वाजता शपथविधी होणार आहे. मुख्यमंत्री चन्नी यांनी शनिवारी राज्यपाल बनवारी लाल पुरोहित यांची भेट घेऊन यासंदर्भात निमंत्रण दिले आहे.
नवी दिल्लीतील राहुल गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर कॅप्टन कॅबिनेटच्या 5 मंत्र्यांना डच्चू देण्यात आला आहे. तर 7 नवीन चेहऱयांचा या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. नव्या मंत्र्यांच्या अंतिम यादीत ब्रह्म मोहिंदरा, राणा गुरजित, मनप्रीत बादल, तृप्ती राजिंदर बाजवा, सुखबिंदरसिंग सरकारिया, अरुणा चौधरी, रझिया सुलताना, डॉ. राज कुमार वेर्का, भारत भूषण आशू, विजय इंदर सिंगला, गुरकीरत कोटली, राजा वडिंग, संगतसिंग गिलजीयान, काका रणदीप सिंग, परगटसिंग, कुलजित सिंग नगर यांची नावे असल्याचे समजते.