ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाबमध्ये काल 2 हजार पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील 24 तासात 2,903 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 57 जणांनी आपला जीव गमावला. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 2 लाख 45 हजार 768 इतका झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, कालच्या दिवशी 2,002 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 2,45,768 रुग्णांपैकी 2 लाख 13 हजार 327 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 6 हजार 983 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
लुधियाना मध्ये कालच्या दिवशी 369 नवे रुग्ण आढळून आले. तर जालंधरमध्ये 439, अमृतसरमध्ये 337, पटियाला 316 आणि सास नगरमध्ये 419 रुग्णांची नोंद झाली.
- 25 हजारपेक्षा अधिक रुग्णांवर उपचार सुरु
ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 60 लाख 14 हजार 612 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 25 हजार 458 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 345 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 33 जण व्हेंटिलेटरवर आहेत.