ऑनलाईन टीम / चंदीगड :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यातच सोमवारी पंजाबमध्ये कोरोनामूळे 5 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळे एकूण 138 जणांनी आपला जीव गमावला आहे. काल झालेल्या मृत्यूंमध्ये पटियालामधील 3, गुरदासपूर आणि संगरुरमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
मागील चोवीस तासात 202 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे पंजाबमधील एकूण कोरोना ग्रस्तांची संख्या 5414 वर पोहोचली आहे. त्यामुळे पंजाबमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तर सोमवारी एका दिवसात 238 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे राज्यात आतापर्यंत 3764 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
आरोग्य विभागाच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत 2 लाख 94 हजार 448 रुग्णांचे नमुने घेण्यात आले आहेत. तर राज्यातील विविध आयसोलेशन वॉर्डमध्ये 1516 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 24 रुग्ण ऑक्सिजन सपोर्टवर आणि 5 जण व्हेंटिलेटरवर आहे.