ऑनलाईन टीम / चंदीगड :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यातच मंगळवारी कोरोनामुळे 6 जणांचा मृत्यू झाला. तर 150 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पंजाबमध्ये आतापर्यंत कोरोनामूळे 144 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, काल सापडलेल्या 150 नव्या रुग्णांमूळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकुण संख्या 5568 झाली आहे. तर कालच्या एका दिवसात 103 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर आत्तापर्यंत एकूण 3867 रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत 3 लाख 1 हजार 830 रुग्णांचे नमुने घेण्यात आले आहेत. तर राज्यातील विविध आयसोलेशन वॉर्डमध्ये 1557 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 23 रुग्ण ऑक्सिजन सपोर्ट वर आणि 4 जण व्हेंटिलेटरवर आहे.
मंगळवारी कोरोनामुक्त झालेल्या 103 रुग्णांमध्ये जालंधरमधील 40, अमृतसर 18, पटियाला 24, मोहाली व गुरदासपुर मधील प्रत्येकी 4, पठाणकोट 3, फतेहगड साहिब 9 आणि मानसामधील एका रुग्णाचा समावेश आहे.