ऑनलाईन टीम / चंदीगड :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यातच गुरुवारी पंजाबमध्ये 441 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 11 हजार 739 झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल राज्यात कोरोनामूळे 8 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात आता पर्यंत 277 जणांनी आपला जीव गमावला आहे. दिलासादायक बाब म्हणजे गुरुवारी 100 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत 7741 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
आरोग्य विभागाच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, मागील चोवीस तासात जालंधर आणि लुधियानामधील प्रत्येकी 2, फिरोजपूर, होशियारपूर, अमृतसर आणि मोहालीमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सध्या राज्यातील विविध रुग्णालयात 3721 रुग्णांना आयासोलेशन वार्डमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यातील 83 जणांची प्रकृती गंभीर आहे. यातील 70 जण ऑक्सिजन वर आणि 13 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे.
एका दिवसात सर्वात जास्त लुधियानामध्ये 88 नवे रुग्ण, जालंधरमधील नव्या 44 रुग्णांसह एकूण 63, पटियालातील नव्या 23 रुग्णांसह एकूण 55, संगरुरमधील नव्या 9 रुग्णांसह एकूण 20, मोहाली मधील नव्या 12 रुग्णांसह एकूण 30, गुरुदासपूर मधील नव्या 6 रुग्णांसह एकूण 12, फतेहगड साहिबमधील नव्या 5 रुग्णांसह एकूण 13, मुक्तसर मधील नव्या 5 रुग्णांसह एकूण 13 रुग्णांचा समावेश आहे.