ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाबमध्ये काल 3 हजार पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील 24 तासात 3,019 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 51 जणांनी आपला जीव गमावला. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 2 लाख 51 हजार 460 इतका झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, कालच्या दिवशी 2,955 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 2,51,460 रुग्णांपैकी 2 लाख 19 हजार 063 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 7 हजार 083 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
लुधियाना मध्ये कालच्या दिवशी 446 नवे रुग्ण आढळून आले. तर जालंधरमध्ये 387, अमृतसरमध्ये 271, पटियाला 213 आणि सास नगरमध्ये 329 रुग्णांची नोंद झाली.
- 25,314 रुग्णांवर उपचार सुरु
ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 60 लाख 80 हजार 083 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 25 हजार 314 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 322 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 33 जण व्हेंटिलेटरवर आहेत.