ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाबमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. पंजाबमध्ये गेल्या 24 तासात 1,077 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 25 जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 29 हजार 013 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमधील एकूण 29,013 रुग्णांपैकी 18 हजार 328 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 731 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 7 लाख 41 हजार 834 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 9954 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 160 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 30 जण व्हेंटिलेटरवर आहेत.