ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाबमध्ये मागील 24 तासात 852 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 33 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 20 हजार 860 इतका झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमधील एकूण 1,20,860 रुग्णांपैकी 1 लाख 05 हजार 585 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 3 हजार 712 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
- 11,563 ॲक्टिव्ह रुग्ण
ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 20 लाख 25 हजार 935 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 11 हजार 563 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 253 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 42 जण व्हेंटिलेटरवर आहेत.