ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाबमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. पंजाबमध्ये गेल्या 24 तासात 1,002 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 32 जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 25 हजार 889 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमधील एकूण 25,889 रुग्णांपैकी 16 हजार 790 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 636 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 6 लाख 97 हजार 327 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 8463 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 139 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 21 जण व्हेंटिलेटरवर आहेत.