ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाबमध्ये मागील 24 तासात 1 हजार 498 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 66 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 01 हजार 341 इतका झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, तर कालच्या दिवशी 1,718 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर आता पर्यंत 77 हजार 127 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 2 हजार 926 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
- 21,228 रुग्णांवर उपचार सुरू
ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 16 लाख 27 हजार 821 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 21 हजार 228 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 565 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 65 जण व्हेंटिलेटरवर आहेत.