@ वृत्तसंस्था / चंदीगड
चीन आणि पाकिस्तानचा हल्ला हाणून पाडण्यासाठी भारतीय वायुदल पंजाबमधील 5 पैकी एका वायुतळावर रशियन हवाई सुरक्षा यंत्रणा तैनात करणार आहे. यात एस-400 सुपरसोनिक आणि हायपरसोनिक समवेत 4 प्रकारची क्षेपणास्त्रs सामील आहेत. एस-400 ही यंत्रणा 400 किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदण्यास सक्षम आहे.
एस-400 ला जगातील सर्वात अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा मानले जाते. ही हवाई सुरक्षा यंत्रणा रॉकेट, क्षेपणास्त्रs, क्रूझ क्षेपणास्त्रs, ड्रोनपासून विमाने पाडविण्यासही सक्षम आहे. पाकिस्तानमधून ड्रोनद्वारे पंजाबमध्ये शस्त्रास्त्रs आणि अमली पदार्थ पाठविले जात आहेत. फेब्रुवारीपर्यंत या सुरक्षा यंत्रणेला पूर्णपणे तैनात करण्यात येणार आहे. याकरिता भारतीय वायुदलाच्या अधिकारी आणि सैनिकांना रशियात प्रशिक्षण देण्यात आले आहे.
सर्वात आधुनिक अस्त्र
पंजाब सेक्टरमध्ये तैनात करण्यात आलेल्या या यंत्रणेत सामील क्षेपणास्त्रs आकाशातून आकाशासह जमिनीवरून आकाशात मारा करू शकतात. भारताच्या स्थितीनुसार ही यंत्रणा अत्यंत उपयुक्त आहे. तर ही यंत्रणा 35 किलोमीटरपासून 400 किलोमीटर अंतरावरील स्वतःच्या लक्ष्याचा भेद करू शकते. या यंत्रणेद्वारे रडारला चकविणाऱया विमानांनाही नष्ट केले जाऊ शकते. एस-400 च्या लाँचरद्वारे 3 सेकंदांत 2 क्षेपणास्त्रs डागली जाऊ शकतात. या क्षेपणास्त्रांचा वेग 5 किलोमीटर प्रति सेकंद इतका असतो.
पूर्व आघाडी मजबूत होणार
भारत आणि रशिया यांच्यात एस-400 क्षेपणास्त्र यंत्रणा खरेदीसाठी 2018-19 मध्ये करार झाला होता. यांतर्गत 5 अब्ज (सुमारे 35 हजार कोटी) डॉलर्स रकमेतून 5 यंत्रणा खरेदी केल्या जाणार आहेत. पहिली यंत्रणा डिसेंबरमध्ये देशात दाखल झाली आहे. याचे सुटे भाग हवाई आणि सागरी मार्गाने देशात पोहोचले आहेत. पंजाबमध्ये एक यंत्रणा तैनात झाल्याने उत्तर सेक्टरमध्ये चीन आणि पाकिस्तान सीमेवरील प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जाईल. तर पंजाबनंतर या सुरक्षा यंत्रणेमुळे पूर्व आघाडीला मजबूत केले जाईल.