ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाबमध्ये दिवसभरात 402 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 16 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 34 हजार 371 इतका झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंतच्या एकूण 1,34,371 रुग्णांपैकी 1 लाख 25 हजार 961 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 4 हजार 227 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
- 4,183 रुग्णांवर उपचार सुरू
ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 26 लाख 30 हजार 382 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 4 हजार 183 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 116 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 15 जण व्हेंटिलेटरवर आहेत.