ऑनलाईन टीम/तरुण भारत
पंजाबमध्ये बीएसएफ – ड्रग्ज माफियांच्यात चकमक झाली असून यामध्ये एक जवान जखमी झाला आहे. पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या पंजाबमधील गुरूदासपूरमध्ये ही चकमक उडाली.
दरम्यान, पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या पंजाबमधील गुरूदासपूरमध्ये सीमा सुरक्षा दल आणि ड्रग्ज माफिया यांच्यात चकमक उडाली. या चकमकीत बीएसएफचा एक जवान जखमी झाला आहे. बीएसएफने या मोहिमेत ४७ किलो हेरॉईन, याचबरोबर एक पिस्तुल आणि काही दारूगोळाही जप्त केला आहे. ही चकमक गुरूदासपूरमधील चंदू वदला पोस्ट जवळ झाली. याबाबतची अधिक माहिती काही वेळात देण्यात येईल असे बीएसएफच्या डीआयजींनी सांगितले आहे.