ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाबमध्ये मागील 24 तासात 500 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 30 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 57 हजार 331 इतका झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, काल 792 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंतच्या एकूण 1,57,331 रुग्णांपैकी 1 लाख 45 हजार 093 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 4 हजार 964 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 33 लाख 95 हजार 729 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 7 हजार 274 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 163 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 14 जण व्हेंटिलेटरवर आहेत.