ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाबमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. पंजाबमध्ये मागील 24 तासात 1 हजार 514 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 56 हजार 989 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमधील एकूण 56,989 रुग्णांपैकी 39 हजार 742 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 1 हजार 618 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 11 लाख 01 हजार 912 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 15 हजार 629 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 440 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 71 जण व्हेंटिलेटरवर आहेत.