ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाबमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. पंजाबमध्ये मागील 24 तासात 2 हजार 817 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 62 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 92 हजार 833 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमधील एकूण 92,833 रुग्णांपैकी 68 हजार 463 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 2 हजार 708 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
- 21,622 रुग्णांवर उपचार सुरू
ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 15 लाख 24 हजार 012 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 21 हजार 662 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 501 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 76 जण व्हेंटिलेटरवर आहेत.